Leopard Attack: कुटुंबावर तुटून पडलेल्या बिबट्याशी लढली, झुंजली; पत्नीनं पती अन् मुलाचा वाचवला जीव

Ambarnath News: कुटुंबावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी लढली, झुंजली; पत्नीनं पती अन् मुलाचा वाचवला जीव
Leopard Attack
Leopard AttackSaam tv

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात बिबट्याने मध्यरात्री एका कुटुंबावर हल्ला चढवला. यावेळी धाडसी पत्नीने बिबट्याचा (Leopard) प्रतिकार करत पती आणि मुलीचे प्राण वाचवले. (Latest Marathi News)

Leopard Attack
Nandurbar News: सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपकडून निदर्शने; पाठिंबा न देण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

मलंगगड परिसरातील (Amabarnath) जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं असताना अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला चढवला. या गोंधळाने जागी झालेल्या सखुबाईने त्वरित मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिंमतीने प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून लावले.

पती जखमी, मुलगीही सुरक्षित

या दरम्यान बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्या हा जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या असून त्याच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र यानंतर अतिशय हिमतीने आपल्या कुटुंबाचं बिबट्यापासून रक्षण करणाऱ्या धाडसी सखुबाईचं कौतुक होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com