काेल्हापूर : पुन्हा पाटील विरुद्ध महाडीक पारंपारिक लढत रंगणार

या निवडणुकेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
satej patil amal mahadik
satej patil amal mahadik

काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाटील आणि महाडीक गट यांच्यात चूरस दिसणार आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने अमल महाडीक यांना काॅंग्रेसचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्या विराेधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे पाटील विरुद्ध महाडीक ही पारंपारिक गटाची लढत पुन्हा एकदा काेल्हापूर वासियांना पहायला मिळणार आहे. satej patil amal mahadik will contest legisltaive election kolhapur latest news

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा जिल्हा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील satej patil यांच्याविरोधात भाजपाने अमल महाडिक amal mahadik यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्हीही उमेदवारांची ताकद मतदारसंघात आहे. या मतदारसंघातील लढती नेहमीच लक्ष्यवेधी होतात.

satej patil amal mahadik
राष्ट्रवादी कॉग्रेस की कॉग्रेस? भवितव्य भाजपाच्या हाती

गत निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक अशी लढत झाली होती. त्यामध्ये महादेवराव महाडिक यांचा पराभव झाला होता. हा पराभव महाडिक परिवाराच्या जिव्हारी लागला होता. आता पुन्हा एकदा महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक आपले नशीब आजमावतील त्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.

भाजपाने आता तयारी केली असली तरी सतेज पाटील यांनी दोन वर्षांपासून निवडणुकीचे तयारी केली आहे. त्यांनीही विजयाचा दावा केला आहे. या निवडणुकेकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. सतेज पाटील यांना महाविकास आघाडी झाल्याने त्याचा फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल अशी चर्चा आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com