Amaravati: कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांच्‍या गोठ्यावरच कारवाई; अमरावतीत १६३ जनावरांची सुटका

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांच्‍या गोठ्यावरच कारवाई; अमरावतीत १६३ जनावरांची सुटका
Amaravati Crime News
Amaravati Crime NewsSaam tv

अमर घटारे

अमरावती : गोहत्या बंदी असूनही बाहेर राज्यातून अमरावती शहरात कत्तलीसाठी जनावरे येत असल्याची माहिती अमरावतीच्या (Amaravati) नागपुरी गेट पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपास करत जनावरांच्‍या गोठ्यावरच कारवाई करत १६३ जनावरांची सुटका केली आहे. (Tajya Batmya)

Amaravati Crime News
आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा; काही तासातच टोळीचा पर्दाफास

पोलिसांना (Police) कत्‍तलीसाठी जनावरे येत असल्‍याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी ते वाहन पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र वाहन पोलिसांना चकवा देत सरळ निघून गेले. यानंतर त्या वाहनांचा पोलिसांनी पाठलाग केला. त्यानंतर पोलिसांच्या हाती कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांचा गोठाच लागला. या गोठ्यात तब्बल १६३ च्यावर जनावरे पोलिसांना मिळून आली.

कत्तलीसाठी जाणाऱ्या सर्व जनावरांना जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीत जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र सरळ गोठ्यातच कारवाई केल्याने अवैध कत्तलखाना मालकांचे धाबे चांगलेच दणालेले आहे. गोहत्याबंदी असूनही जनावरांची तस्करी केल्या जाते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com