Amaravati News: धक्‍कादायक..रुग्णवाहिका मिळाली नाही; भीक मागत आई– वडिलांचा मृतदेहासह एसटी बसने प्रवास

धक्‍कादायक..रुग्णवाहिका मिळाली नाही; भीक मागत मृतदेहासह बसने प्रवास
Amaravati News
Amaravati NewsSaam tv

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरीता किशोर कासदेकर या महिलेचा चिमुकला (Nagpur) नागपूर येथे दगावला. यानंतर आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका व मदत न दिल्यामुळे नागपूर ते अमरावतीपर्यंत मृतदेह एसटी बसने (St Bus) आणावा लागला. (Letest Marathi News)

Amaravati News
Crime News: आईसोबत प्रेमसंबंध असल्‍याची कुणकुण; मुलाने केली हत्‍या

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांचा मेळघाटात दौरा झाला. मात्र आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या जीवावर उठल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळत आहे. चिखलदरा तालुक्यातील धरमडोह या गावामधील सरीता किशोर कास्देकर या महिलेची प्रसुती टेंबुरसोडा प्रा. आ. केंन्द्र येथे झाली. बाळाची प्रकृती बिघडल्यावर उपचाराकरीता बाळाला टॅम्बुसोंडा येथून अचलपुर व अचलपुरवरुन (Amaravati) अमरावती व अमरावती येथून नागपुर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले. अठरा दिवस बालकावर नागपुर येथे उपचार करण्यात आला. उपचारादरम्यान बालकाचा नागपुर येथे रुग्णालयात (Hospital) मृत्यु झाला.

शासकीय रुग्णवाहिका दिली नाही

नियमानुसार मृतक बालकाचा मृतदेह त्याच्या पालकांसह शासकीय रुग्णवाहिकेने त्यांच्या घरी गावामध्ये पोहचविणे आवश्यक होते. पण डॉ. चंदन पिंपरकर वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंन्द्र टॅम्ब्रुसोंडा व डॉ. दिलीप रणमळे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचेशी मृतकाचे नातेवाईकांनी वारंवार संपर्क करुन सुध्दा त्यांनी मृतदेह नेण्याकरीता कोणताही प्रतिसाद दिला नाही. संबंधित डॉक्टरासह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com