मीटर नाही अन्‌ वीजबिल 1600 रुपये; भिक मांगो आंदोलन करत अभियंताना दिले पैसे

मीटर नाही अन्‌ वीजबिल 1600 रुपये; भिक मांगो आंदोलन करत अभियंताना दिले पैसे
MSEDCL
MSEDCLSaam tv

अमर घटारे

अमरावती : महावितरणकडून अमरावती (Amaravati) शहरातील वडाळी परिसरात राहणाऱ्या रविन्द्र डोंगरे या वीज ग्राहकाला मीटर नसताना १ हजार ६०० रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. यामुळे प्रहार जनशक्‍तीतर्फे भिक मांगो आंदोलन करत बिलाचे पैसे दिले. (Amaravati News)

MSEDCL
एसटी बंद काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत घ्या; धनंजय मुंडेंची ट्विट करत सरकारकडे मागणी

घरी वीज मीटर नसताना आलेले वीज बिल पाहून रवींद्र डोंगरे या ग्राहकास धक्काच बसला. त्यामुळे आज (MSEDCL) प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भिक मांगो आंदोलन करत पैसे गोळा केले. गोळा झालेले पैसे अभियंताकडे सुपूर्त केले व बिल कशाच्या आधारावर आले? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे महावितरणने कोणत्या आधारावर वीज बिल दिले? असा प्रश्न उपस्थित होत असून, या घटनेमुळे महावितरणचा शहरातील भोंगळ कारभार उघड झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com