पेट्रोल- डिझेलच्या दराचा उच्चांक; सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले
Petrol Price

पेट्रोल- डिझेलच्या दराचा उच्चांक; सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले

पेट्रोल- डिझेलच्या दराचा उच्चांक; सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले

अमरावती : पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींनी अमरावतीत उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे आज सोमवारी अमरावतीकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर १११.९० रुपये, तर डिझेलसाठी १०२.५५ रुपये मोजावे लागले. (amaravati-news-Petrol-diesel-price-hike-The-budget-of-ordinary-citizens-collapsed)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किंमती २०१४ नंतरच्या उच्चांकी पातळीवर गेल्याने इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. पेट्रोलियम पदार्थ वितरकांच्या माहितीनुसार तेल विपणन कंपन्यांनी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ केली आहे. मात्र, आगामी काळात परिस्थिती न सुधारल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊ शकते.

आठवडाभरात सहावेळा वाढ

गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्यादरात सहावेळा वाढ झाली. इतके दिवस शंभरीच्या आतमध्ये असणारे डिझेलही आता महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या क्रूडचा दर ७८.१७ डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षातील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल ८१ डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढविणे शक्य नाही..त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेट कूड ९० डॉलर्स प्रति बॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Petrol Price
जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या जानेवारीत निवडणुका

१ रुपयाचा अधिभार

पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूकदार, सामान्य नागरिक यांचे आर्थिक गणित बिघडले असून पेट्रोल आणि डिझेलमध्ये यापूर्वी केलेल्या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या तीन आठवड्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. सोबतच अमरावती शहरात विकासकामांसाठी घेण्यात आलेल्या कर्जामुळे पेट्रोल– डिझेलवर १ रुपयाचा अधिभार लावण्यात आला असल्याने शहरात इंधनाचे दर हे अधिक झाले आहेत. शासनाने हा अधिभार कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया पेट्रोल पंप व्यवसायिक सौरभ जगताप यांनी युसीएन सोबत बोलताना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com