थर्टीफर्स्ट ओमीक्रॉनच्या दहशतीत; १५०० पोलिसांचा बंदोबस्त

थर्टीफर्स्ट ओमायक्रॉनच्या दहशतीत; १५०० पोलिसांचा बंदोबस्त
थर्टीफर्स्ट ओमीक्रॉनच्या दहशतीत; १५०० पोलिसांचा बंदोबस्त
थर्टीफर्स्ट

अमरावती : नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. शिवाय ओमायक्रॉनमुळे शहर पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबाबत नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात शहरात ३१ डिसेंबरच्या रात्री दीड हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी, अंमलदार तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले. (amaravati-news-Thirty-first-night-curfew-Omicron-one-and-half-thousand-police-personnel)

थर्टीफर्स्ट
Nandurbar : रात्रीत दोन खून; हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याचा वाद

थर्टीफर्स्ट (Thirty First Night) अर्थात ३१ डिसेंबरला रात्री शहरातील मुख्य चौक आणि महत्त्वाच्या मार्गावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहीम राबवून ब्रिथ अॅनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. जे वाहनचालक मद्य पिऊन आहेत; त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला जाणार आहे. याशिवाय स्टंट रायडिंग, वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर ‘इंटरसेप्टर’ वाहनांद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहे.

रात्री नऊपासून संचारबंदी

ओमायक्रॉन (Omicron) आणि कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून राज्य शासनाने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) लागू केली आहे. या काळात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली. हा आदेश ३१ डिसेंबरच्या रात्री सुद्धा शहरात लागू राहणार आहे. सोबतच १ जानेवारीला सुद्धा हे सर्व नियम शहरात लागू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी सांगितले.

तिनही उड्डाणपूल बंद

शुक्रवार आणि शनिवार अमरावती (Amaravati) शहरातील इर्विन चौक ते राजापेठ, गाडगेनगर आणि राजापेठ परिसरातील तिन्ही उड्डाणपूल ३१ डिसेंबरला रात्रभर बंद राहणार आहेत. या ठिकाणच्या उड्डाण पुलावर कारवाईसाठी वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांची पायी आणि वाहनांद्वारे गस्त सुरू राहणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.