Ambernath |तरुणाला पोत्यात भरून तलावात फेकलं; अंबरनाथमधील खळबळजनक घटना

एका २० वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरत त्याला दगडं बांधून तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे.
ambernath crime news
ambernath crime news saam tv

Ambernath Crime news : अंबरनाथमधून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. एका २० वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरत त्याला दगडं बांधून तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे.आठवडाभरात झालेल्या या दुसऱ्या हत्येनं अंबरनाथ (Ambernath) शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

ambernath crime news
Crime: अपहरण, ५० लाखांची खंडणी आणि अॅक्शन; मानपाडा पोलिसांनी आरोपींना फिल्मी स्टाईलने पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या जावसई गावाजवळ डिफेन्स कॉलनीच्या मागच्या बाजूला तलाव आहे. या तलावात एक मृतदेह टाकण्यात आल्याचं स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळी आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहाय्यानं हा मृतदेह बाहेर काढला. यावेळी एका २० ते २५ वर्षांच्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचं समोर आले.

संपूर्ण विवस्त्र अवस्थेत असलेला हा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात गुंडाळण्यात आला होता. तसंच हा मृतदेह पाण्यात फेकल्यानंतर तो वर येऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या तीन गोण्यांमध्ये मोठमोठे दगडं भरून या गोण्या मृतदेहाला बांधण्यात आल्या होत्या. मात्र मृतदेह पाण्यात फुगल्यानं त्याचं डोकं पाण्याबाहेर आलं आणि ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. या मृतदेहाबाबत जवळपासच्या भागात चौकशी केली असता हा मृतदेह उल्हासनगरच्या हनुमान नगर टेकडी परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.

ambernath crime news
आई म्हणावं का राक्षसीण? डॉक्टर महिलेने पोटच्या ४ वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकलं

दरम्यान, गुरुवारी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया केल्यानंतर आज पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा आणि क्राईम सीन रिक्रिएशन केलं. यावेळी पोलिसांसह या गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या स्थानिक समाजसेविका जयश्री गुप्ता आणि अन्य स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून पोलिसांपुढे आता या हत्येच्या आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com