Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांसोबतच शहर शाखाही शिंदेंच्या शिवसेनेकडे

Ambarnath News : अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथमधील ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
Uddhav Thackeray and aaditya thackeray
Uddhav Thackeray and aaditya thackeray Saam TV

Ambarnath Shivsena News : अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथमधील ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सोमवारी पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत प्रवेशासंबंधी सकारात्मक चर्चा होताच शिवसेनेच्या शहर शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray and aaditya thackeray
Sheetal Mhatre Case : शीतल म्हात्रे व्हिडिओ मोर्फ प्रकरणी युवा सेनेच्या नेत्याला अटक; पोलिसांनी केली तब्बल ७ तास चौकशी

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळं ठाकरे गट शहर शाखेसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली ही शाखा आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.

ठाणे जिल्हा आणि त्यातही अंबरनाथ शहरात शिवसेनेचा दबदबा आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे शहरावर एकहाती पकड आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील त्यांची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. दरम्यान, अंबरनाथमध्ये (Ambernath) एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray and aaditya thackeray
Maharashtra Political News : भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश होताच कडाडून विरोध; थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या शाखाप्रमुखास मारहाण

उल्हासनगर शहरामध्ये शिंदे गटाच्या शाखाप्रमुखास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत शाखाप्रमुख विनायक अहिरे गंभीर जखमी झाले आहेत ,येथील टिळक नगर मध्ये विनायक आणि त्याचा मित्र अमित सोनवणे हे दोघे रस्त्याच्या कडेला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोलत होते.

अचानक पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सराईत आरोपी जय उर्फ जॉकी आलम चंदाने सुरज उर्फ मॉन्टी अशोक यांनी लोखंडी रोडने विनायक यांच्या डोक्यात प्रहार करून जखमी केले या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय,तर विनायक यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे,याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com