Maharashtra Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; अंबरनाथमध्ये ठाकरे गट शिवसेनेत विलीन होणार

अंबरनाथमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी शिवसेनेत सामील होणार आहे.
Uddhav Thackeray and aaditya thackeray
Uddhav Thackeray and aaditya thackeray Saam TV

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी शिवसेनेत सामील होणार आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असणार आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता असून यापुढे अंबरनाथमध्ये (Ambernath) एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray and aaditya thackeray
Govt Employee Strike: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 19 लाख कर्मचारी संपावर

अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खासदार शिंदे यांनीही यापुढे अंबरनाथ शहरात एकच शिवसेना असेल, आणि पूर्वीप्रमाणे सगळे एकत्र काम करतील, अशीही प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी दिली.

दरम्यान, अंबरनाथमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत सामील होण्याच्या निर्णयानंतर शाखेतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो बाहेर काढले आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचे उरले सुरले पदाधिकारी शिवसनेत गेल्याने त्या भागात ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Uddhav Thackeray and aaditya thackeray
MNS News : मोठी बातमी! मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा तापणार; मनसे आक्रमक, गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?

ठाणे जिल्हा आणि त्यातही अंबरनाथ शहरात शिवसेनेचा दबदबा आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे शहरावर एकहाती पकड आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील त्यांची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. त्यामुळे अंबरनाथ भागात डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दबदबा वाढताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com