अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ

अंबरनाथ विभागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ
अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळअजय दुधाणे

अंबरनाथ - शहरासह संपूर्ण अंबरनाथ Ambernath विभागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मंगळवारी रात्री उशिरा एक मेडिकल Medical आणि एक ज्वेलर्स दुकान फोडून मोठी चोरी Theft केल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरीनंतर अंबरनाथ विभागातील चोरी-घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या सर्वोदय नगर परिसरात गेटवेल मेडिकल आणि जय सद्गुरू नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात काल मध्यरात्री तीन चोरटे घुसले आणि त्यांनी कटरच्या सहाय्याने कुलूप, ग्रील आणि शटर तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर मेडिकलच्या दुकानातून ३० हजार रूपये रोख रकमेसह काही सामानही चोरून नेले. तर जय सद्गुरु ज्वेलर्समधून तब्बल १८ तोळे सोनं, तीन ते चार किलो चांदी यावर चोरट्यांनी डल्ला मारला.

धक्कादायक बाब म्हणजे चोरी करून परत जाताना दोन्ही दुकानातले सीसीटीव्हीचे डिव्हीआर सुद्धा हे चोरटे सोबत घेऊन गेले. शेजारच्या दुकानातील सीसीटीव्हीत हे चोरटे दुकानात शिरताना कैद झाले आहेत.

अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ
राज्यातील पैलवान होणार मालामाल, कुस्ती लिगमुळे मिळणार संधी

दरम्यान अंबरनाथ विभागातील शिवाजीनगर, अंबरनाथ पश्चिम, बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि हिललाईन अशा पाचही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसात चोरीच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झली आहे. त्यामुळे अंबरनाथ विभागातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळेच पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत कॅमेरासमोर काहीही बोलायला नकार दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com