Barshi Crime : रुग्णवाहिकेवर असणाऱ्या तरुण चालकाचं धक्कादयक कृत्य! डॉक्टरांकडून क्वार्टरची चावी घेतली अन्...

Ambulance driver ends life : मिळालेल्या माहितीनुसार मयूर जाधव बुधवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयामध्ये आला होता आणि त्याने वैद्यकीय अधिकाऱ्याकडे क्वार्टरची चावी मागितली.
Ambulance driver ends life
Ambulance driver ends lifesaam tv

Barshi Ambulance driver ends his life : बार्शी शहरात तरुणांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. बुधवारी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या क्वार्टरमध्ये बीव्हीजी कंपनीच्या १०८ या रुग्णवाहिकेच्या चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

मयुर दिलीप जाधव (वय ३२ रा.सोलापूर रोड) असे आत्महत्या केलेल्या रुग्णवाहिका चालक तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगडे यांनी बार्शी शहर पोलिसांना दिली. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्यापूर्वी घडली.

Ambulance driver ends life
Ganeshotsav 2023: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींवर बंदी घालू नका; CM शिंदेंच्या भूमिकेला भाजप नेत्याचा विरोध!

गेल्या एक महिन्यांपासून शहरात तरुणांच्या गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिस ठाण्यातील नोंदींवरुन ही संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे तरुण नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या करीत आहेत याची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयूर जाधव बुधवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयामध्ये आला होता. त्याने वैद्यकीय अधिकाऱ्याकडे फ्रेश होण्यासाठी क्वार्टरची चावी मागितली. डॉ. रुग्णालयात रुग्णांची तपासणी करीत होते त्यामुळे त्यांनी मयूरला क्वार्टरची चावी दिली. यानंतर तो कॉर्टरमध्ये गेला आणि तिथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Breaking News)

Ambulance driver ends life
Gautami Patil Reaction: 'पाटील' आडनाव लावणं टाळणार का? गौतमीने एका वाक्यात विषयच संपवला

मयूर जाधव याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात डॉ. शीतल बोपलकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस हवालदार सोमनाथ जगताप करीत आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com