शाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थान दुर्घटनेची अमित देशमुखांकडून दखल

जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा (तालुका पाचोरा) येथील लोकशाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानाची पावसामुळे झालेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतली आहे.
शाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थान  दुर्घटनेची अमित देशमुखांकडून दखल
शाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थान दुर्घटनेची अमित विलासराव देशमुखांकडून दखलSaamtv

जळगाव : नगरदेवळा तालुका पाचोरा येथील लोकशाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानाची पावसामुळे झालेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसात शाहीर शिवाजी पाटील यांचे घर पडल्यामुळे त्यांच्यासमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बातमी समाज माध्यमावर आल्याबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी तात्काळ दखल घेतली.

हे देखील पहा :

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून शाहीर शिवाजी पाटील यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा इतर योजनांमधून घरकुल मंजूर करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

शाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थान  दुर्घटनेची अमित विलासराव देशमुखांकडून दखल
Dhule : धुळ्यात दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांची बदल्या!

ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन याबाबत सकारात्मक असून, शाहीर शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानाचा प्रश्न लवकर सुटेल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग हा कलाकारांच्या नेहमीच पाठीशी असून अडचणीच्या काळात कलाकारांना योग्य ते सहकार्य करण्याची सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका आहे असेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com