Amit Deshmukh : 'डीपीसी' च्या निधीवरुन अमित देशमुख नाराज

मार्चपर्यंत हा माध्यमातून ३०२ कोटींची तरतूद खर्च करणे अपेक्षित आहे.
Amit Deshmukh
Amit Deshmukhsaam tv

Amit Deshmukh : लातूर (Latur) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जातो. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ या वर्षासाठी ३०२ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, फेब्रुवारी मध्यावधी आला असला तरी आतापर्यंत केवळ ५९ कोटी ७३ लाखांच्या निधीचे वितरण झाले आहे, तर ३९ कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

Amit Deshmukh
MCA : राज्यातील क्रिकेटपटूंसाठी 'एमसीए' चे अध्यक्ष Rohit Pawar यांनी दिली आनंदाची बातमी, म्हणाले...

निधी खर्चात प्रशासन उदासिन असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता उर्वरित निधीचा खर्च मार्चअखेरपर्यंत करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. यासाठी जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीमार्फत तयार केला जातो. (Maharashtra News)

त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाते. यामध्ये आमदार (mla), खासदार अशी समिती असते. २०२२-२३ या जिल्हा परिषद सदस्य, निमंत्रित सदस्य वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या करण्यात आली आहे. मार्चपर्यंत हा माध्यमातून ३०२ कोटींची तरतूद खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत ५९.७३ लाखांचे वितरण झाले असून, अर्थात १९.७७ टक्के खर्च झाला आहे.

Amit Deshmukh
Satara : रामराजे नाईक निंबाळकरांना काेणाचं राजकारण कळेना ?

ही बाब फार दुर्दैवी आहे. यामुळे जिल्ह्याचा विकास होणार नाही. वेळोवेळी ही बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली पण उदासीनता आहे. याच उत्तर शासनाला सामान्य माणसाला द्यावं लागणार असल्याचे माजी पालकमंत्री तथा (latur) आमदार अमित देशमुख स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com