मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची फसवणूक; 2 आरोपींना अटक

विलास सहकारी साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर येथील एका व्यक्तीला नांदेड येथून लातूर पोलिसांनी अटक केली
मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची फसवणूक; 2 आरोपींना अटक
मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची फसवणूक; 2 आरोपींना अटकSaam Tv

लातूर : शहरापासून नजिक असलेल्या निवळी Nivali येथील, विलास सहकारी साखर कारखान्याची Sugar factory फसवणूक factory केल्याप्रकरणी अहमदनगर Ahmednagar येथील एका व्यक्तीला नांदेड Nanded येथून लातूर Latur पोलिसांनी Police अटक Arrested केली असून, अन्य दोघांना नांदेडच्या कारागृहातून ताब्यात घेतले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निवळी येथील साखर कारखान्यातील ८ हजार ३६४ मेट्रिक टन साखर निर्यात करायची होती. त्यासाठी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील 'कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'चे प्रतिनिधी अभिजीत देशमुख याच्यामार्फत कंपनीसोबत करार करण्यात आला होता.

हे देखील पहा-

यानुसार निवळीच्या कारखान्यातून साखर घेऊन गेल्यापासून ९० दिवसांच्या आत सदरील साखर निर्यात केल्याबाबतचे कागदोपत्री पुरावे कारखाना प्रशासनास सादर करणे आवश्यक होते. असे असताना कागदपत्रे कारखान्यास सादर केलेली नाही. कारखाना प्रशासनाने वेळोवेळी कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा कागदपत्रे देण्यास कंपनीने टाळाटाळ केली.

मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची फसवणूक; 2 आरोपींना अटक
आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करणं हा राज्य शासनाचा बहुमान- अमित देशमुख

यामुळे, साखर कारखान्याचे ८ कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कंपनीचे संचालक आणि इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्याची साखर खुल्या बाजारात विक्री करून आर्थिक नुकसान करत फसवणूक केली आहे. निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे विधी सहाय्यक अशोक तोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील आरोपी अभिजीत वसंतराव देशमुख याला आता अटक करण्यात आली आहे. आरोपी अभिजीत देशमुख याने दिलेल्या माहितीवरून तामिळनाडू येथील प्रदीपराज चंद्राबाबू आणि एडीगा उर्फ मनीकांत उर्फ मुनीकृष्णा या अन्य दोन आरोपींना नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, कुरींजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमीटेड कंपनी' च्या संचालक मंडळाचा प्रमुख असलेला बालाजी उर्फ पांडू शेट्टी हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com