निलंगा देवणी, शिरूर अनंतपाळ भागात अमित देशमुख पाेहचले बांधावर

amit deshmukh
amit deshmukh

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. श्री. देशमुख यांनी आज निलंगा देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विविध गावातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. amit-deshmukh-visits-farms-flooded-area-latur-marathi-news-sml80

amit deshmukh
नाद खूळा! कस्तुरी सावेकरने माऊंट मनस्लूवर फडकवला तिरंगा

निलंगा येथील गौर मांजरा नदीच्या पुराने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानाची पाहणी केल्यानंतर मंत्री देशमुख बाेलत हाेते. ते म्हणाले लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी व मांजरा नदीच्या पुराने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबराेबरच सविस्तर अहवाल राज्य शासनास पाठवून देण्याचे आदेश केल्याचे मंत्री देशमुख यांनी नमूद केले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास कटीबध्द आहाे असेही मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

यावेळी अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रांताधिकारी अधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने, तहसीलदार गणेश जाधव आदी उपस्थित होते.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com