CRPF शिवाय देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत राहूच शकत नाही : अमित शहा

union home minister amit shah planted the 10 millionth sapling during CRPF training centre in nanded
union home minister amit shah planted the 10 millionth sapling during CRPF training centre in nanded

संंताेष जाेशी

नांदेड : सीआरपीएफच्या जवानांना crpf jawan कुठलीही जबाबदारी दिली तरी ते ती चांगल्या पध्दतीने हाताळतात असे काैतुक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे सीआरपीएफच्या जवानांचे केले. सीआरपीएफच्या सैनिकांच्या बलिदानाने देश सुरक्षित असल्याचे सांगत देशाची अंतर्गत सुरक्षित अबाधीत असल्याचे गृहमंत्र्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्य़ातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दल येथील मैदानात एक कोटीवावे वृक्ष आज लावण्यात आले. या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

union home minister amit shah planted the 10 millionth sapling during CRPF training centre in nanded
सुटीतील पर्यटनासाठी जाणून घ्या १७ hoilday special trains

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्य़ातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दल येथील मैदानात एक कोटीवावे वृक्ष आज लावण्यात आले. देशात एक कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. देशातील विविध कॅम्पमध्ये 99 कोटी 99 लाख 99 हजार 999 वृक्ष लावण्यात आली होती. आज शहा यांच्या हस्ते एक कोटीवं पिंपळाचं वृक्ष लावण्यात आले आहे union home minister amit shah planted the 10 millionth sapling during CRPF training centre in nanded. यावेळी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह केंद्रीय राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयाेजिलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिनी वृक्षाराेपणाचा कार्यक्रम घेतल्याचा आनंद हाेत आहे. वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्ती येत आहेत. ओझोन वायू कमी होत आहे. वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन केले तर मनाला समाधान मिळते. वृक्ष संगोपन करणे हे सीआरपीएफच्या जवान करीत आहेत याचा आनंद वाटताे असेही त्यांनी नमूद केले.

सीआरपीएफच्या सैनिकांच्या बलिदानाने देश सुरक्षित असल्याचे शहा यांनी नमूद करीत सीआरपीएफच्या जवानांना कुठलीही जबाबदारी दिली तरी ते ती चांगल्या पध्दतीने हाताळतात असे काैतुक केले. पुर्वीच्या काळी काेणत्याही सुविधा नसताना सीआरपीएफच्या जवानांनी देशाची सुरक्षा यशस्वीपणे हाताळली आहे. प्रारंभी गृहमंत्री शहा यांनी पर्यावरण जागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com