राज ठाकरेंच्या सभेपूर्वी अमित ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, आम्ही...

राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी अमित ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी अमित ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, आम्ही...
Amit Thackeray Saam Tv

औरंगाबाद- राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादला (Aurangabad) जाहीर सभा उद्या होणार आहे त्यासाठी ते आज पुण्याहून औरंगाबाद कडे रावणा झाले आहेत. त्याआधी राज ठाकरे यांचे पुत्र काल औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी अमित ठाकरे (Amit Thackeray) कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. यावेळी अमित ठाकरे यांनी एक महत्वाचे व्यक्तव्य केले आहे.

हे देखील पाहा-

एवढ्या मोठ्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्य मर्यादेचं पालन कसं होणार? असे अमित ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावर अमित ठाकरे म्हणाले की, आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असे मोठं विधान अमित ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

Amit Thackeray
गर्भलिंगनिदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश; डॉक्टर फरार

उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे पार पडणार आहे. या सभेची मनसेने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात आवाजाची मर्यादाही घालण्यात आली आहे. 50 ते 55 डेसिबलपर्यंत आवाज असावा असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.