एसटी कर्मचारी आंदाेलनाचं 'असं' होऊ नये : खासदार अमाेल काेल्हे

सांगली येथून पुण्याला जाण्यासाठी शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे.
amol kolhe
amol kolhe

सांगली : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात एक सुवर्णमध्ये साधायला हवा. दाेन पाऊल काेणी तरी पुढे यावे काेणी तरी मागे घ्यावेत. एसटीचे आंदाेलन हे राजकारणाचा भाग हाेऊ नये अशी भावना खासदार अमाेल काेल्हे (amol kolhe) यांनी सांगली येथे व्यक्त केली.

amol kolhe
प्रवाशांसाठी खूषखबर; सातारा- स्वारगेट शिवशाही बस सेवा सुरु

एसटी कर्मचा-यांच्या आंदाेलनाचे आता राजकारण हाेऊ लागले आहे का या प्रश्नावर खासदार काेल्हे म्हणाले या आंदोलनात एक सुवर्णमध्य शोधायला हवा. काेणीतरी पुढे किंवा मागे पावले टाकावीत. हे आंदाेलन राजकारणाचा भाग होता कामा नये. राजकारणाचा भाग झाला तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण आजपर्यंत अनेक प्रकरणातून पाहिले आहे. एसटीच्या बाबतीत असं होऊ नये.

ग्रामीण भागात दळणवळणाचे साधन एसटी आहे. आता शाळा, कॉलेज सुरू होणार आहेत. हे सर्व एसटीवर अवलंबून आहे असेही खासदार काेल्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान सामान्य जनता एसटी कर्मचा-यांचा संप केव्हा मिटेल याची वाट पाहत आहे. सांगली येथून पुण्याला जाण्यासाठी शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com