पंकजा मुंडे यांना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषद आणि राज्यसभेची उमेदवारी न देण्यामागे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे
पंकजा मुंडे यांना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

अकोला : राज्यात राज्यसभा निवडणुकीची जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर राज्यातील १० विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. भाजपकडून या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा पत्ता कट करण्यात आला आहे.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषद आणि राज्यसभेची उमेदवारी न देण्यामागे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. ( Maharashtra Politics News )

पंकजा मुंडे यांना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
शिवसेना आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये आशिष शेलारांची हजेरी; चर्चांना उधाण

अमोल मिटकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रमाणिकपणे काम करून महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणारे विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना तर बाजूलाच ठेवले. तर केशव उपाध्ये हे भजन कीर्तनापुरते मर्यादित ठेवले. सर्व जुन्या चेहऱ्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली यावरून हे सिद्ध होते की, देवेंद्र फडणवीस हे हुकूमशहा आहेत. ते जाणीवपूर्वक या सर्वांना डावलत आहेत. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषद आणि राज्यसभेची उमेदवारी न देण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, भाजपने विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी देण्याची चर्चा होती.

मात्र, त्यांना विधानपरिषदी उमेदवारी डावलल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या आरोपावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com