Mla Amol Mitkari, Mla Nitin Deshmukh Sangharsh Yatra
Mla Amol Mitkari, Mla Nitin Deshmukh Sangharsh Yatrasaam tv

Mla Amol Mitkari News : लक्षात ठेवा ‘चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे’ असतात, परतफेड निश्चित करु; अमाेल मिटकरींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

नागपूरच्या वेशीवर आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mla Amol Mitkari News : मतदारसंघातील पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रा घेवून निघालेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh latest news) यांना ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावात नागपूर पोलिसांनी वागणूक दिली आहे, त्यावरून या राज्यात सैतानी साम्राज्याचा उदय झाला असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. (Maharashtra News)

Mla Amol Mitkari, Mla Nitin Deshmukh Sangharsh Yatra
Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी Cool बातमी, पुढील चार दिवस उकाड्यापासून मिळणार दिलासा

अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बाळापूर आणि अकोला तालुक्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता रद्द केल्याच्या विरोधात आमदार देशमुख यांनी (ता. १० एप्रिल) अकोला ते नागपूर संघर्ष यात्रा (Mla Nitin Deshmukh Sangharsh Yatra) काढली होती.

आज (गुरुवार) नागपूरच्या वेशीवर आमदार देशमुख आणि त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाण्यास मनाई करण्यारे पत्र बुधवारी नागपूर पोलिसांनी दिले होते.

त्यानंतर आमदार देशमुख संघर्ष यात्रा घेवून जाण्यावर ठाम राहिले. आज (गुरुवारी) सकाळीच त्यांना नागपूरच्या सिमेवरून पोलिसांनी ताब्यात घेतले व शिवसैनिकांसोबत अकोल्याला रवाना केले.

यावर राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. विशेषतः विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कृतीसाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांच्या कारवाईला बेकायदेशीर म्हटले आहे. मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या आमदार देशमुख व त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने अमानुष वागणूक देण्यात आली त्यावरून या राज्यात सैतानी साम्रज्य सुरू असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला.

Mla Amol Mitkari, Mla Nitin Deshmukh Sangharsh Yatra
KDMC News : 27 गावांच्या न्याय हक्कासाठी 20 एप्रिलला कल्याण डोंबिवली महापालिकेवर धडक मोर्चा : सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा निर्धार

अकोला जिल्ह्यातही आता राज्यघटनेची पायमल्ली होत असून, लोकशाही शिल्लक राहिली नसल्याचे आमदार मिटकरी यांनी नमूद केले. त्यांनी सत्ताधारी भाजपला इशारा देताना ‘चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे’ असतात हे लक्षात ठेवून महाविकास आघाडी या सर्व प्रकाराची परतफेड केल्या शिवाय राहणार नाही, असे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com