
- सुशिल थोरात
Nagar : गुन्हा दाखल करून घेत नसल्याच्या निषेधार्थ नगर (nagar) शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यासमोर (kotwali police station) बाळासाहेबांची शिवसेनेचे नगरसेवक अमोल येवले (Amol Yewale) हे रात्री बारा वाजल्यापासून उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारी रात्री केडगाव येथील रंगोली हॉटेलवर (hotel) भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलाने त्याच्या सहकाऱ्यांनी दगडफेक केली होती. त्याच वेळेस अमोल येवले हे त्या ठिकाणी गेले असता अमोल येवले यांना त्या टोळक्यातील काही लोकांनी डोक्याला बंदूक लावून ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद अमोल येवले यांना द्यायची होती.
मात्र पोलिसांनी ही फिर्याद घेण्यास नकार दिल्याने रात्री बारा वाजल्यापासून अमोल येवले हे कोतवाली पोलीस स्टेशनच्या दारात उपोषणाला बसले. रात्री त्यांनी पोलीस स्टेशनच्या दारातच जेवण करून तिथेच ठिय्या मांडत मुक्काम केला आहे. (Breaking Marathi News)
मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही. केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणात अमोल येवले हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. याच कारणावरून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हणणे अमोल येवले यांचे आहे. पोलीस भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली आपली तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.