Amravati News: धक्कादायक! २३ वर्षीय विद्यार्थीनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या; अमरावतीत खळबळ

विद्यार्थीनीने कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे...
Amravati Crime News
Amravati Crime NewsSaam Tv

अमर घटारे, प्रतिनिधी...

Amravati Crime News: अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील होमिओपॅथि महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Amravati Crime News
Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिपदाचे आमिष दाखवून ६ आमदारांना कोट्यवधींचा गंडा; राजकीय वर्तुळात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती (Amravati News) शहरातील राजापेठ येथील महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋतुजा मेंढरे असे या २३ वर्षीय तरुणीचे नाव असून ती परभणी येथील रहिवासी आहे. या महाविद्यालयात ती द्वीतीय वर्षाला शिकत होती.

विद्यार्थीनी महाविद्यालयामागे असलेल्या खासगी हॉस्टेलमध्ये तिसऱ्या माळावर राहत होती. सकाळी तिच्या खोलीत कसलीही हालचाल न झाल्याने आणि ती खाली न आल्याने केअरटेकरला संशय आला. यावेळी खोलीत जावून पाहताच ऋतुजाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. (Latest Marathi News)

Amravati Crime News
Pandharpur News: मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका; मेसेस पाठवून माजी जिल्हा परिषद सदस्य बेपत्ता

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या आत्महत्येचा सखोल तपास करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com