Amravati Crime : दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल; दोघांविरोधात गुन्हा

ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली आहे.
Amravati Crime News
Amravati Crime NewsSaam Tv

अमर घटारे

Amravati News : अमरावती (Amravati) येथे एक संतापजनक घटना घडली आहे. एका २७ वर्षीय तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Amravati Crime News)

Amravati Crime News
Tractor Accident : भयंकर! ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू

तर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या आणखी एक व्यक्तीने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे व्हिडिओ शूट केले. इतकेच नाही तर तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे.

एकाने अत्याचाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले तर दुसऱ्याने ते व्हॉट्सॲपवर शेअर केले अन् पाहता पाहता शेकडो लोकांकडे तो व्हिडिओ फॉरवर्ड झाला. बलात्काराच्या अनेक घटना होत असताना मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.

Amravati Crime News
Santosh Munde Death : प्रसिद्ध Tik Tok स्टार संतोष मुंडेचा करंट लागून मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

पोलीस तक्रारीनुसार, दोन्ही आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार), ३४ व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळी दोघांनाही अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी याने फिर्यादी युवकाला घरी बोलावून त्याला दारू पाजली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्या व्हिडिओची शहरात सर्वत्र चर्चा होत असताना पोलिसांनी घटनेची दखल घेतली. फिर्यादीला बोलावून घेतले त्यानंतर ते संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com