धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात धारधार शस्त्राने वार करून दोघांची हत्या

अमरावती जिल्ह्यात दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Amaravati Crime News
Amaravati Crime NewsSaam Tv

अमरावती : अमरावती (Amaravati) जिल्ह्यात बडनेरा येथील दडबडशहा दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लोणी रोडवरील दडबडशहा दर्ग्याच्या आवारात दोन इसम झोपले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास या दोघांचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Amaravati Crime News
Lakhimpur : संतापजनक! दोन सख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार; खून करून मृतदेह झाडावर बांधले

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, मृतकांमध्ये मुजावर अनवर (वय ५०) राहणार लाल खडी आणि तौसीफ खान (वय २५) राहणार कारंजा अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी लोणी व बडनेरा पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Amaravati Crime News
सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? पवारांचा CM शिंदेंना टोला

यातील आरोपी अजुनही फरार आहेत. दर्ग्याचा सेवादार अन्वर मुजावर (वय ५०) वर्ष रा. राहणार लालखडी अमरावती व तोफिक (वय२५) अशी मृतांची नावे आहेत. रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या झालाचा अंदाज बडनेरा पोलिसांनी व्यक्त केला आहे, सकाळी शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोनही मृतदेह दिसल्यानंतर या ठिकाणी पोलिसांना माहिती देण्यात आली.

सुरुवातीला अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त सिंग यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे, दरम्यान त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दर्ग्यांमधील लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. मात्र हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे कळू शकलेले नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com