Amravati : जिल्हाधिकारी कार्यालयात राडा; महर्षी पब्लिक स्कुल वर कठोर कारवाईची मागणी

अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल मधील आदित्य काळमेघ या विद्यार्थ्यांने शाळेची पूर्ण प्रवेश फी भरली नाही म्हणून त्याच्या दहावीच्या गुणपत्रिकेवर कमी मार्क टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
Amravati : जिल्हाधिकारी कार्यालयात राडा; महर्षी पब्लिक स्कुल वर कठोर कारवाईची मागणी
Amravati : जिल्हाधिकारी कार्यालयात राडा; महर्षी पब्लिक स्कुल वर कठोर कारवाईची मागणीअरुण जोशी

अमरावती :- अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल मधील आदित्य काळमेघ या विद्यार्थ्यांने शाळेची पूर्ण प्रवेश फी भरली नाही म्हणून त्याच्या दहावीच्या गुणपत्रिकेवर केवळ 52 टक्के मार्क टाकल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर समोर आला होता. त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाळेवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

हे देखील पहा :

परंतु, दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा महर्षी पब्लीक स्कुल वर शिक्षण विभागाने कुठलीही कारवाई केले नसल्याने आदित्य काळमेघ या १५ वर्षीय विद्यार्थी दोन दिवस उपोषणाला बसला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी काल सायंकाळी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. आज उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठक सुरू असतानाच भाजप मनसे व या शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकांमध्ये जोरदार राडा झाला.

Amravati : जिल्हाधिकारी कार्यालयात राडा; महर्षी पब्लिक स्कुल वर कठोर कारवाईची मागणी
Corona : राज्यात नऊ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण!

दरम्यान, लवकर या विद्यार्थ्याला न्याय देऊन शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी यांनी दिली. आमचा शिक्षण विभागही या प्रकरणाला जुमानत नसल्याची खंत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली असून त्यांनी माफी मागितली आहे. दरम्यान, या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा शिक्षण विभागाला दिले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.