जिल्हा बॅंक निवडणुकीत माजी आमदार बिनविराेध; १०५ अर्ज वैध

जिल्हा बॅंक निवडणुकीत माजी आमदार बिनविराेध; १०५ अर्ज वैध
amravati district cooperative bank election

अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत amravati district cooperative bank election अर्जांच्या छाननीनंतर आमदार राजकुमार पटेल, जयश्री देशमुख, हरिभाऊ पळसकर यांचे अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या विराेधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविराेध हाेणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अमरावती सेवा सहकारी सोसायटीमधून सहा, भातकुली येथून पाच, अचलपूुरातून चार, चांदुरबाजार येथून चार, धारणी येथून चार, चांदूर रेल्वे येथून दोन, धामणगाव रेल्वे येथून दोन, तिवसा येथून पाच, दर्यापुरातून चार, अंजनगाव सुर्जी येथून पाच, नांदगाव-खंडेश्वर येथून पाच, चिखलदरा येथून दोन, मोर्शी येथून सहा तसेच वरुड सेवा सहकारी सोसायटीतून एक अर्ज वैध ठरला आहे.

amravati district cooperative bank election
महाराष्ट्रातील या खेळाडूंची झाली भारतीय शरीरसौष्ठव संघात निवड

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मतदारसंघातून आठ जण रिंगणात आहेत. तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातून सात, विमुक्त जाती व भ.जा. व वि.मा.प्र. मधून सहा, महिला प्रतिनिधीमधून १३ तसेच क-१ मधून १२ व क-२ मधून पाच जणांची उमेदवारी वैध ठरली आहे.

वरुड सेवा सहकारी सोसायटीतून माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या व्यतिरिक्त एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने ते या मतदारसंघातून बिनविराेध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चांदूर रेल्वे सोसायटीमधून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या विराेधात किशोर कडू, धामणगाव रेल्वे सेवा सोसायटीतून सुनील ससोदे यांच्या विराेधात श्रीकांत गावंडे तसेच चिखलदरा येथे दयाराम काळे व संभूजी खडके यांच्यात लढत हाेईल अशी आशा आहे.

तब्बल १४ दिवसानंतर (ता. २२ सप्टेंबर) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतरच बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com