अमरावती : पाेलिसांवर हात टाकल्याने वाद चिघळला; ज्येष्ठांची सबूरी

amravati
amravati
Summary

या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल बाजी मारते की राज्यमंत्री बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनल बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मतमोजणीच्या दुस-या टप्पा सुरु असताना सहकार पॅनल आणि पाेलिसांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यवसन लाठी चार्जमध्ये झाले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या चिडलेल्यांनी पाेलिसांवर हात टाकला. त्यातून वाद चिघळला. अखेर ज्येष्ठ नेते मंडळींनी समजूत काढत वातावरण शांत केले. amravati-district-cooperative-bank-election-result-update-yashomati-thakur-bacchu-kadu-breaking-news-sml80

आज (मंगळवार) सकाळी संत गाडगे महाराज सभागृहात मतमाेजणीस प्रारंभ झाला. सहकार पॅनलने बॅंकेच्या सत्तेकडे वाटचाल केल्याचे चित्र दुपारी दाेन पर्यंत स्पष्ट झाले. त्यामुळे सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आनंदाेत्सव साजरा करीत हाेते. काहींनी फटाके फाेडले. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटकले. या कारणावरून पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला.

amravati
'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर' असं सेनेचं वागणं : खाेत

हा वाद सुरू असताना बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व सहकार पँनलचे प्रमुख यांचे एका व्यक्तीने अभिनंदन केले व त्याच वेळेस त्यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यानी त्या खिसे कापणा-या व्यक्तीस पकडले. काही कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगविण्याकरिता सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये बबलू देशमुख यांच्या सहपुतण्या यांनाही लाठीचार्जचा सामना करावा लागला.

दरम्यान त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पाेलिसांवर हात टाकल्याने वाद चिघळला. त्यातून सहकार पॅनलचे कार्यकर्ते आणि पाेलिसांत झटापट झाली. काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी समजूत काढत वादावर पदडा टाकण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. काही वेळानंतर युवा कार्यकर्त्यांना ज्येष्ठ मंडळींनी वाहनातून नेल्यानंतर वातावरण शांत झाले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com