अमरावती : 36 सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसाचार भडकला...

मालेगाव, अमरावती आणि नांदेड या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
अमरावती : 36 सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसाचार भडकला...
अमरावती : 36 सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसाचार भडकला... Saam Tv

अमरावती : मालेगाव, अमरावती आणि नांदेड या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. आतापर्यंत ३६ बनावट सोशल मीडिया अकाउंट समोर आली असून, त्यानुसार सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे देखील पहा-

अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी या ठिकाणी संचारबंदी तर आजूबाजूच्या जिल्ह्यांत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद देखील करण्यात आली आहेत. नाशिक पोलिसांनी मालेगाव हिंसाचार प्रकरणी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

अमरावती : 36 सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसाचार भडकला...
राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांवर दुबार फवारणीचे संकट

तसेच नाशिक, नांदेड आणि अमरावती पोलिसांनी हिंसाचाराविषयी आपला एक स्वतंत्र अहवाल तयार करून राज्य पोलीस मुख्यालय आणि गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. या खात्यांद्वारे त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचार विषयीचे फेक मेसेज तयार करून व्हायरल करण्यात आले आहेत. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील अपशब्द वापरल्याची माहिती यावेळी मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com