अमरावती : पोलीस बंदोबस्तात धारणीत कायदा व सुव्यवस्था कायम!

अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आपापली दुकाने बंद ठेवून भाजपा कडुन करण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद दिला.
अमरावती : पोलीस बंदोबस्तात धारणीत कायदा व सुव्यवस्था कायम!
अमरावती : पोलीस बंदोबस्तात धारणीत कायदा व सुव्यवस्था कायम!अरुण जोशी

अमरावती : सुजलाम सुफलाम तसेच राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या भारत देशाच्या त्रिपुरा येथे काही समाजकंटकांनी दोन समाजात संघर्ष निर्माण करण्याच्या उद्देशाने गैरप्रकार करुन दंगा केला होता. ज्याचा असर महाराष्ट्रातील अमरावती शहरांमध्ये गेल्या शनिवारी बघावयास मिळाला, ज्यामध्ये मुस्लिम समाज आणि हिंदू समाज समोरासमोर आले होते. परिणामी यामध्ये अनेक निर्दोष नागरीकांचे नुकसान सुद्धा झाले.

हे देखील पहा :

यालाच अनुसरून भारतीय जनता पार्टी द्वारे रविवारी पूर्णतः बंद पुकारण्यात आले होते. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आपापली दुकाने बंद ठेवून भाजपा कडुन करण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद दिला. तसे बघितले तर धारणी शहर हे आपल्या देशाप्रमाणे एकता आणि एकात्मतेचा तसेच सर्वधर्म सहिष्णुतेचा संदेश देणारे शहर असून या ठिकाणी सर्व धर्मातील नागरिक एकोप्याची भावना मनात ठेवून प्रेमळ वृत्तीने एकमेकांसोबत जीवन जगतात. जरी अमरावती शहरामध्ये दोन समाजात संघर्ष निर्माण झाला आहे, तरी धारणी शहरात याचा कोणताच असर झाला नाही.

अमरावती : पोलीस बंदोबस्तात धारणीत कायदा व सुव्यवस्था कायम!
Breaking: गडचिरोलीतील चकमकीत नक्षलवाद्यांचा बडा नेता मिलींद तेलतुंबडे ठार
अमरावती : पोलीस बंदोबस्तात धारणीत कायदा व सुव्यवस्था कायम!
तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये

शहरातील नागरिकांनी आजही आपले सामाजिक बंध टिकवून ठेवल्याचे दिसून येत आहे. बंद ला अनुसरून धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धारणी पोलीस कर्मचारी आणि पोलीस अमलदार यांचा कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याबाबत तगडा बंदोबस्त दिसून आला. स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून शांतता कायम राखण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे धारणी शहरातील व्यवसायिक व नागरिकांनी अमरावतीत दोन समाजामध्ये झालेल्या संघर्षाचा तीव्र निषेध करून धारणी शांततामय वातावरण कायम ठेवले आहे हे विशेष.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com