Amravati News : अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलीस तपासात मोठी माहिती उघड

लव्ह जिहाद आरोप प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे
Amravati  Love Jihad Case
Amravati Love Jihad CaseSaam TV

अमर घटारे, साम टिव्ही

अमरावती : लव्ह जिहाद आरोप प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अमरावतीतून (amravati) बेपत्ता असलेली हिंदू तरुणी ही स्वत:च घरातून निघून गेली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलीस (police) आयुक्त आरती सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मला राग आल्याच्या कारणावरून मी घर सोडलं असा जबाब सदरील तरुणीने सातारा पोलिसांना दिला आहे. (Amravati Love Jihad Case)

Amravati  Love Jihad Case
Love Jihad ? अमरावती पाेलिसांनी साता-यातून घेतलं 'त्या' युवतीस ताब्यात; पोलीस आयुक्त म्हणाल्या...

अमरावती लव्ह जिहाद काय आहे प्रकरण?

अमरावतीत एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं होतं. हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. प्रकरण समोर येताच खासदार नवनीत राणा, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडें यांच्यासह हिंदू संघटनांनी लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला होता.

इतकंच नाही तर, खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीवरून पोलीस ठाण्यात २० मिनिटं जोरदार राडा केला होता. जर बेपत्ता झालेली तरुणी सापडली नाही तर, आंदोलन करू असा इशारा देखील राणा यांनी पोलिसांना दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका सोहेल शहा नामक तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलिस त्याची कसून चौकशी करीत होते. (Amravati Love Jihad News Today)

Amravati  Love Jihad Case
Shivendraraje Bhosale : उदयनराजे पुर्वी कुचकं बाेलायचे आता ते..., शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, आज सकाळी पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध लावला. सदरील तरुणीला पोलिसांनी साताऱ्यातून ताब्यात घेतलं. ही तरुणी रेल्वेने एकटी प्रवास करत होती, ती आता सुखरूप असून पुणे व सातारा पोलिसांची यात मदत घेतली. तरुणीचा शोध लागताच भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग व संपुर्ण पोलीस अधिकारी कर्मचारी यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत अमरावती पोलिसांचे अभिनंदन केले.

बेपत्ता झालेल्या तरुणीचा जबाब सातारा पोलिसांनी नोंदविला असून मी रागाच्या भरात स्वत:हून घरातून बाहेर पडले' असा जबाब तरुणीने सातारा पोलिसांना दिला आहे. दरम्यान, अमरावती येथे आल्यानंतर तरुणीची चौकशी करुन पुढील माहिती दिली जाईल. असं पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी नमूद केले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com