H3N2 Influenza : अमरावतीमध्ये "एच३ एन२" रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; आरोग्य यंत्रणा अलर्ट

अमरावती शहरात एक दिवसा आधी "एच३ एन२" इन्फ्लुएन्झाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता.
H3N2 Outbreak
H3N2 Outbreaksaam tv

अमर घटारे

Amravati News : कोरोना महामारीनंतर आता "एच३ एन२" या आजाराने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. देशभरासह आता राज्यात देखील या रोगाचा शिरकाव झाला आहे. तसचे याने बळी देखील जात आहेत. नागपूरमध्ये "एच३ एन२" संशयित रुग्णाचा पहिला बळी गेला. अशात आता या विषाणूची लागण झपाट्याने होत असल्याच दिसत आहे. (H3N2 Influenza)

अमरावती शहरात एक दिवस आधी "एच३ एन२" इन्फ्लुएन्झाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज पुन्हा नव्याने दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. अमरावती शहरात तीन इन्फ्लुएंझा व्हेरिएंटचे तीन रुग्ण अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास आणि नाक गळणे अशी लक्षणे असल्याने त्यांचे नमुने तपासणीला पाठवले होते.

H3N2 Outbreak
H3N2 नं राज्याची चिंता वाढली ! पाहा काय आहेत लक्षण, कशी घ्यायची काळजी !

त्यापैकी अमरावती शहरातील अकोली रोडवरील ३५वर्षीय पुरुष हे पहिले रुग्ण तर आज 14 वर्षीय मुलगा आणि 29 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

H3N2 Outbreak
Crime News : धक्कादायक! कारागृहात कैद्याला बेदम मारहाण; ६ जणांवर गुन्हा दाखल

राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार?

राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ मार्च रोजी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती.

H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होतो. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अंतर पाळा तसेच मास्क वापरा, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.

कोरोना रुग्णांमध्येही होतेय वाढ

H3N2 ची रुग्ण संख्या वाढत असताना आता पुण्यात पुन्हा कोरोना विषाणूने सुद्धा डोकं वर काढलं आहे. गेल्या पंधरा दिवसात पुण्यात १८१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वातावरण बदलामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे H3N2 सह कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com