
अमर घटारे
अमरावती : सुटीचा दिवस असल्याने पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करून स्वतःची कर घेऊन चिखलदरा (Chikhaldara) येथे पर्यटनासाठी निघाले होते. मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत (Accident) कोसळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळहा भीषण अपघात झाला आहे. मृतक व जखमी हे आंध्रप्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुटी असल्याने फिरायच्या निमित्ताने चिखलदरा येथे पर्यटनासाठी ७ जण कारमध्ये निघाले होते. परंतु पर्यटनस्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांच्या कारचा अपघात झाला. घाट रस्ता असल्याने येथे कार अनियंत्रित होऊन कार थेट खोल दरीत कोसळली.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
चिखलदरा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला असून यात घटनास्थळी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी घटनास्थळी मदतकार्य सुरू जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. मात्र अपघातातील मृतकाची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.