अमरावती : संचारबंदीतून आज पाचव्‍या दिवशी चार तासांची सूट

अमरावती : संचारबंदीतून आज पाचव्‍या दिवशी चार तासांची सूट
अमरावती : संचारबंदीतून आज पाचव्‍या दिवशी चार तासांची सूट
Amaravati Curfew

अमरावती : अमरावती शहरात हिंसाचारानंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. सलग चार दिवस संचारबंद राहिल्‍यानंतर आजचा संचारबंदीचा पाचवा दिवस उजाळला. यात आज (ता.१७) संचारबंदीमध्‍ये चार तासांची सूट देण्यात आली आहे. (Amravati-news-Four-hours-relief-from-curfew-today-on-the-fifth-day)

Amaravati Curfew
मालेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा

भाजी मार्केट ही गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने भाज्यांच्या किंमतीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच फटका या संचारबंदीचा बसत आहे. आज संचार बंदीचा पाचवा दिवस असून संचारबंदीमध्ये आज चार तासांची सूट देण्यात आली आहे. मात्र इंटरनेट बंद असल्या कारणाने बँकेसोबत ऑनलाईन व्यवहार बंद पडले आहे आणि याच परिस्थितीचा आढावा.

शंभर कोटींचे व्‍यवहार ठप्‍प

संचारबंदीत खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचा परिणाम बँकांवरही झाला आहे. सोबतच संचारबंदीमुळे शहरातील सर्वच बँका दोन दिवस बंद राहिल्या. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील दोन्ही दिवसांचे सुमारे १०० कोटीचे व्यवहार ठप्प पडले. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथूनच जिल्ह्याच्या विविध भागात रकमेचे आदान प्रदान होत असते. मात्र शहरातील सर्व बँकाच बंद राहिल्याने कोणतीही आर्थिक उलाढाल झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com