Kalicharan Maharaj : धर्मासाठी खून कारणं काहीही वाईट नाही; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान

कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Kalicharan Maharaj
Kalicharan MaharajSaam Tv

अमर घटारे

Kalicharan Maharaj Controversial Statement : कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच कालिचरण महाराजांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच कालीचरण महाराजांनी रविवारी अमरावतीत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर आता त्यांनी धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही असे विधान केले आहे. कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Kalicharan Maharaj
Maharashtra Politics : शिंदे सरकारला घेण्यासाठी ठाकरेंची नवी रणनिती; संजय राऊत आज कोणता राजकीय बॉम्ब फोडणार?

धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही. आपले सर्व देवी देवता हिंसक आहे म्हणून आपण त्यांना पूजतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?, छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज (kalicharan Maharaj) यांनी केले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वावक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Tajya News)

आपले सर्व देवी देवता हिंसक आहे म्हणून खून करणं काही वाईट नाही जर उद्देश धर्मासाठी आणि देशासाठी असेल तर खून करणं काहीही वाईट नाही. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थित भक्तांना संबोधित करताना कालीचरण यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

Kalicharan Maharaj
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार?; कोर्टाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

'पुढच्या १० वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल'

पुढच्या १० वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल, कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'हिंदूचं (Hindu) राहणीमान आणि मुस्लिमांचं राहणीमान यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देशात १४० कोटी जनता आहे'. तर देशात ९४ कोटी हिंदू आहे, तर ४६ कोटी मुस्लिम आहे.

पुढच्या दहा वर्षात देशात मुस्लीम पंतप्रधान होईल. महिलांना बुरख्यात राहावं लागेल, असा दावा कालीचरण महाराज यांनी केला आहे.'पूर्वीच्या काळात पाकिस्तानला भारत प्रतिउत्तर देत नव्हता. भारताला लगतचे सर्व देश पहिले भारताचे होते. मात्र ते आता सर्व हातून गेले आहे. देशातील पाच लाख मंदिर नष्ट केले. याला इतिहास साक्ष आहे, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com