Amravati News: संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, तरुणाने आईसह सख्ख्या भावाला संपवलं; मोर्शीतील दुहेरी हत्याकांडांचा उलगडा

Amravati Crime News: चारित्र्यावरील संशयातून एका मुलाने आपल्या आईसह भावाची निर्घृणपणे हत्या केली.
Amravati news young man killed his mother and brother in Morshi taluka due to suspicion of character
Amravati news young man killed his mother and brother in Morshi taluka due to suspicion of characterSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Crime News: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. चारित्र्यावरील संशयातून एका मुलाने आपल्या आईसह भावाची निर्घृणपणे हत्या केली. तब्बल ८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. हत्येनंतर आरोपी मुलगा हैदराबाद येथे लपून बसला होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत त्याला अटक केली आहे.

सौरभ गणेश कापसे (वय २०, वर्ष) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर नीलिमा गणेश कापसे (वय ४८ वर्ष) आणि आयुष गणेश कापसे (वय १८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांना १ ऑगस्टला सौरभची आई व लहान भावाचे मृतदेह आढळले होते. (Latest Marathi News)

Amravati news young man killed his mother and brother in Morshi taluka due to suspicion of character
Gautami Patil Father Passed Away: नृत्यांगणा गौतमी पाटीलला पितृशोक; वडील रवींद्र पाटील यांचं पुण्यात निधन

त्याचवेळीपासून सौरभ बेपत्ता होता व त्याचा मोबाईल बंद होता, तसेच मृतांचे मोबाइल सुध्दा गायब होते. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभच्या वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर त्याची आई दोन मुलांसह राहत होती. सौरभ व त्याच्या आईमध्ये वाद व्हायचे.

दरम्यान, सौरभला त्याच्या आईच्या चारित्र्यावरही संशय होता. यातूनच त्याने आई व लहान भावाचा खून (Crime News) करायचे ठरवले. ‎ यासाठी मागील ४ ते ५ महिन्यांपासून तो सातत्याने इंटरनेटवर खून कसा ‎करावा, कोणत्या पध्दतीने करावा यासाठी विविध पद्धतींचा अभ्यास करत होता.‎

वैद्यकीय ज्ञान बऱ्यापैकी असल्यामुळे त्याने यूट्यूबवर त्याबाबत ‎माहिती घेतली. आरोपी सौरभ याने आई आणि भावाला संपवण्यासाठी प्लान आखला. त्याने जेवणातील भाजीमध्ये धोत्र्याच्या बिया टाकल्या. ही भाजी खाताच त्याच्या आई आणि भावाची तब्येत खराब झाली. त्यानंतर सलाईन लावण्याच्या बहाण्याने आरोपीने दोघांनाही गुंगीचं औषध दिलं.

Amravati news young man killed his mother and brother in Morshi taluka due to suspicion of character
ISRO Scientist Death: चांद्रयान-3 प्रक्षेपणावेळीचा आवाज हरपला; इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सलाईनमध्ये गुंगीच्या औषधाचा अतिडोस दिल्याने दोघांचाही झोपेतच मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याची खात्री होताच त्याने मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून घरातील बेडमध्ये लपवून ठेवले.

त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो घर सोडून निघून गेला. ८ दिवसानंतर दुर्गंधी पसरत असल्याने पोलिसांच्या मदतीने घर उघडण्यात आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या आरोपी सौरभचा शोध घेतला. यावेळी सौरभ हैदराबाद येथे असल्याचं पोलिसांना (Police) कळालं.

पोलिसांचं एक पथक तातडीने हैदराबादला रवाना झालं. त्यानंतर आरोपी सौरभला अटक करण्यात आली. आता त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कौटुंबिक वादातून मुलाने आईसह भावाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com