Amravati News: अमरावतीत स्वच्छतेसाठी कोट्यवधींचं कंत्राट, स्वच्छता मात्र शून्य; नागरिकांनी केलं हटके आंदोलन

Amravati News: अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Amravati News
Amravati NewsSaam tv

अमर घटारे

Amravati News: अमरावती महानगरपालिकेमध्ये गेल्या एक वर्षापासून प्रशासकराज सुरू आहे. संपूर्ण महानगराची देखभाल स्वच्छतेची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आहे. अमरावती शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षाला ३५ ते ४० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं जातं. मात्र शहरात प्रशासकराज असल्याने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक नगरात कचऱ्याचे ढिगारे तसेच साचलेले दिसून येत आहे. (Latest Marathi News)

अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेकदा स्थानिक नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Amravati News
Pune Accident News: पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात, भरधाव गाडीची 5-6 गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

अस्वच्छतेमुळे नागरिकांनी हटके आंदोलन केलं आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी कचऱ्याच्या ढिगार्‍या सभोवताली रांगोळी टाकून महानगरपालिकेच्या आयुक्तांचे लक्ष वेधले.

नागरिकांचं म्हणणं आहे की, 'नगरात कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.कोट्यवधींचं कंत्राट देऊनही कंत्राटदार योग्य साफसफाई करत नाही. अनेकदा महानगर पालिकेकडे पत्रव्यवहार केला. मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रशासनचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कचऱ्या सभोवताली रांगोळी टाकली'.

अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये 40 टक्केच जलसाठा, नागरिकांची चिंता वाढली

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात तापमानात वाढ होत असून तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचले आहे. या तापमानाचा जिल्ह्यातील पाणीसाठयावर मोठा परिणाम होत आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने जिल्ह्यातील 54 प्रकल्पात पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 40% टक्केच पाणी साठा शिल्लक आहे.

Amravati News
Nana Patole On PM Narendra Modi: 'मी PM मोदी यांच्यासारखा खोटारडा माणूस नाही'; नाना पटोलेंचा हल्लाबोल

वाढत्या तापमानामुळे एका आठवड्यात १२ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणीसाठ्याची घट झाली आहे. त्यामुळे तापमान असेच वाढत राहिले तर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणत कमी झालेला दिसणार आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com