अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु

रात्रीची संचारबंदी कायम...
अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु
अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: अमरावतीकरांना Amravati आजपासून संचारबंदीतून मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी ७ वाजतापासून तर रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ वाजतापासून तर सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी राहणार आहे. जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. शहरात घडलेल्या हिंसात्मक घटनेवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. मंगळवारपासून संचारबंदीत मोठ्या शिथिलता देण्यात आहे. सकाळी ७ वाजतापासून तर रात्री ९ वाजतापर्यंत शहरातील सर्व बाजारपेठ सुरू राहणार आहेत.

हे देखील पहा-

तर, रात्री 9 वाजतापासून तर सकाळी ७ वाजतापर्यंत शहरात कडक संचारबंदी राहणार आहे, संबंधित आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी निर्गमित केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला मार्केट तसेच सक्करसाथ, इतवारा यांना दिलेली सूट ही कायम राहणार आहे.

अमरावती: संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु
जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून आणि चाकूने वार करत केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

दरम्यान, अमरातवीत बंदला हिंसक Amravati Violence वळण लागून हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदचे आदेश देण्यात आले होते. भाजपान केलेल्या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागलं होतं. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली होती. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे आज होणाऱ्या भाजप आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com