Amravati : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत राडा; पाेलिसांचा लाठीचार्ज (पाहा व्हिडीओ)

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत एकूण ७७४ मतदार आहेत. यापैकीच ४५० पेक्षा अधिक मतदार हे पाटील आहेत.
amravati , shivaji shikshan sanstha, election ,voting, police.
amravati , shivaji shikshan sanstha, election ,voting, police.saam tv

- अमर घटारे

Shivaji Shikshan Sanstha : अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूकीसाठी (election) आज मतदान हाेत आहे. एका मतदान केंद्रावर दोन गटात मोठा राडा झाला. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट लागले. दरम्यान पोलिसांनी (police) कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांची शिक्षण संस्था आहे. मतदान केंद्रावरही मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना सुद्धा धक्काबुक्की झाली. (amravati breaking news in marathi)

स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषेच्या ९ पदाकरिता आज सकाळी ८ वाजल्या पासून मतदान सुरू झाले आहे. असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत एकूण ७७४ मतदार आहेत. यापैकीच ४५० पेक्षा अधिक मतदार हे पाटील आहेत.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे नेतृत्वाखाली प्रगती पॅनल, तर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे विकास पॅनल परस्पराविरुद्ध मैदानात उभे आहेत. दोन्ही पॅनल मधील अध्यक्ष पदाकरिता २, उपाध्यक्षपदाकरिता ६, कोषाध्यक्ष २, कार्यकारणी सदस्य पदाकरिता ८ असे एकूण 18 उमेदवार आहेत. एका उमेदवाराला ९ मते देण्याचा अधिकार आहे.

amravati , shivaji shikshan sanstha, election ,voting, police.
Mahableshwar : महाबळेश्वरात 'एसबीआय' चं एटीएम फाेडण्याचा प्रयत्न फसला; तिघे ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com