अमरावती: एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; जिल्ह्यात संप कायम...

महाराष्ट्र शासनाचा लोगो जोवर एसटीला लागणार नाही, तोवर संप मागे घेणार नसल्याची भूमिका अमरावतीमधील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
अमरावती: एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; जिल्ह्यात संप कायम...
अमरावती: एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; जिल्ह्यात संप कायम...अरुण जोशी

अमरावती: शासनाच्या पगार वाढीच्या निर्णयावर आम्ही समाधानी नाही. एसटीच्या विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार सध्या संपावर (ST Strike Maharashtra) असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाचा (Government of Maharashtra) लोगो जोवर एसटीला लागणार नाही, तोवर संप मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी (St Workers) घेतली आहे. (Amravati: ST staff insists on merger; Strike continues in the district)

हे देखील पहा -

गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा, यासाठी शासनाने बुधवार २४ रोजी वेतनवाढीची घोषणा केली. एसटीच्या विलीनीकरणासाठी (Merger) नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ही घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना हा निर्णय मान्य नसल्याचे अमरावती जिल्ह्यातील कर्मचारी संपावर ठाम आहेत.

अमरावती: एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; जिल्ह्यात संप कायम...
एसटी कर्मचारी आंदाेलनाचं 'असं' होऊ नये : खासदार अमाेल काेल्हे

प्रवाशांचे हाल आणि उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेता, राज्य परविहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी आंदोलनावर (agitation) कायम असल्याने अमरावती जिल्हयातील आठही आगारातील ११४ एसटीच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com