धक्कादायक! जन्मदात्या बापानेच लहान पोरांना दारू पाजली, व्हिडीओ व्हायरल

अमरावती जिल्ह्यामधून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जन्मदात्या बापानेच लहान मुलांना दारू पाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
amravati news
amravati news saam tv

अमर घटारे

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यामधून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जन्मदात्या बापानेच लहान मुलांना दारू पाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलांना दारू पाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांकडून पित्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Amravati viral video news )

amravati news
बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; शाळकरी मुलांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरातील संतापजनक प्रकार समोर आला आहे. सदर व्हायरल व्हिडीओ हा कौंडण्यपूर-अंजनसिंगी रोडवरील बार जवळील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील पित्याचा हा संतापजनक कारनामा आहे. लहान मुलांना दारू पाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांकडून या पित्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पित्यावर पोलीस (Police) कारवाई करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

amravati news
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आखला नवा प्लान, अख्खा महाराष्ट्रच पिंजून काढणार

दरम्यान,या व्हिडीओवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी भाष्य केलं आहे. कुलकर्णी म्हणाले,'ज्या अमरावती जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन केलं. या जिल्ह्यातून हा व्हिडीओ समोर यावा, हे अत्यंत खेदजनक आहे. या मुलांना गंमत म्हणून दारू पाजत असतील, तर पुढे त्या मुलांना व्यसन लागू शकतं. त्यामुळे पुढे आयुष्यभर त्यांना दारूचं व्यसन लागू शकतं. याची किंचित देखील जाणीव त्या पालकाला दिसत नाही.

पालकत्व कसं नसावं हा सांगणारा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियाच्या काळात लाईक्स, कमेंट्ससाठी पुढील परिणामाचाही विचार हा व्यक्ती करत नाही. हे शहरीभागातही वेगळ्या माध्यमातून घडतं. शहरात पालक मुलांसमोर व्यसन करतात, सरकार घरपोच दारू पोहोचवण्याची सोय करतं. या साऱ्यामुळे राज्यात व्यसन करणाऱ्यांचं वय हे हळूहळू कमी होत चाललं आहे. त्याला पालकांचा असा दृष्टीकोन जबाबदार आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com