राणा दाम्पत्याच्या सुटकेसाठी महिलांचे शिव मंदिरात पारायण

Amravati : राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर व्हावा, यासाठी अमरावती शहरातील महिलांच्या वतीने शिवमंदिरात पारायणाचे पठण करण्यात येत आहे.
राणा दाम्पत्याच्या सुटकेसाठी महिलांचे शिव मंदिरात पारायण
Navneet RanaSaam TV

अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) हे सध्या राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात आहे. आज त्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार असून त्यांना जेल होणार की बेल मिळणार? याचा निर्णय काही वेळातच होणार आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर व्हावा, यासाठी अमरावती (Amravati) शहरातील महिलांच्या वतीने पारायणाचे पठण करण्यात येत आहे.

शहरातील शिवशक्ती नगरातील शिव मंदिरात महिलांच्या वतीने गजानन महाराज यांच्या 21 पारायनाचे पठण करण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळावा यासाठी आपण पारायणाचे पठण करत असल्याची माहिती या महिलांनी दिली आहे. त्यासाठी त्यांनी गजानन महाराज यांच्या 21 पारायणाचे पठण सुद्धा सुरू केले आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर (Bail application) शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राणांच्या जामीन अर्जाला सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी जोरदार विरोध केला.

जर राणा दाम्पत्य कोठडीतून बाहेर आले तर पुन्हा तोच तमाशा होईल, राडा होईल, ही सुनावणी फक्त जामीनाची नसून ते जर बाहेर आले तर परिस्थिती आणखी बिघडेन, असं अॅड. घरत यांनी न्यायालयाला सांगितलं. तर हनुमान चालिसा पठण करणं हा राजद्रोह होऊ शकत नाही. राणा दाम्पत्य मातोश्रीवर गेले नाहीत, जी घटना घडलीच नाही त्यावर गुन्हा कसा नोंद होऊ शकतो, असा उलट सवाल राणा दाम्पत्याच्या वकीलांनी केला.

Navneet Rana
तुरुंगात असलेल्या मलिकांना किडनीचा त्रास, देशमुखांना खांदेदुखी तर राणांना स्पॉन्डिलायसिस

दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत सोमवारी (2 मे) निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज दोघांच्या जामीन अर्जावरचा निकाल न्यायालयाकडून थोड्याच वेळात दिला जाईल. त्यामुळे राणा दाम्पत्यांना दिलासा मिळतो की, त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढतो हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.