वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video

बँक खात्यात जमा झालेले १४ लाख रुपये माझे नाहीत, असे म्हणत मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज यांनी सर्वांचे लक्ष्य वेधले.
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video अरुण जोशी

अमरावती : धारणी आजच्या युगात पैशांसाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. मात्र, काही लोक याला अपवाद ठरतात. असाच एक प्रसंग मेलगहत मधील धारणीत समोर आला असून चुकून बँक खात्यात आलेले लाखो रुपये त्यांनी परत केले आहेत. दहा दिवसांपूर्वी बँक खात्यात जमा झालेले १४ लाख रुपये माझे नाहीत, असे म्हणत धारणीतील ट्रकचालकाने सर्वांचे लक्ष वेधले. धारणी येथील बँकेत हा प्रकार घडला. त्याच्या प्रामाणिकतेमुळे मूळ मालकाला ही रक्कम परत करता आली.

प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज असे या ट्रकचालकाचे नाव आहे. शहरातील स्टेट बँकेत रोजच्या प्रमाणे गर्दी जमलेली असताना तो हातात पासबुक आणि मोबाइल घेऊन आतमध्ये शिरतो. भिरभिर नजरेने गर्दीतून वाट काढत तो कसाबसा टेबलजवळ आला. अडखळत्या शब्दांमध्ये त्यांनी मोबाइलमधील मेसेज दाखवले. माझ्या खात्यात १४ लाख रुपये जमा झाले आहेत; पण, ते कुणी केले, हे मला माहिती नाही. हे पैसे माझे नाहीत, हे नक्की, असे म्हणताच सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video
तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video
बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video
अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!

दहा दिवसांपूर्वी खात्यावर पैसे जमा होऊनही त्यांनी एक रुपयाही काढला नव्हता. याउलट बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले. आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी शाखेकडून ई-मेल आल्यानंतर हे पैसे शनिवारी आरटीजीएसने परत करण्यात आले. याबद्दल बँकेचे व्यवस्थापक शशांक गजभिये व मिलिंद नेरकर यांनी त्यांचे आभार मानले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com