मद्यधुंद वाहकाचं धावत्या बसमध्ये लोटांगण, प्रवाशांना दिली अव्वाच्या सव्वा तिकिटं!

Yavatmal Rajura Bus: बट्टे याने इतकी दारू ढोसली होती की, त्याने प्रवाशाकडून अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट फाडले.
मद्यधुंद वाहकाचं धावत्या बसमध्ये लोटांगण, प्रवाशांना दिली अव्वाच्या सव्वा तिकिटं!
Yavatmal Rajura BusSaam Tv

यवतमाळ: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका एसटी बसच्या (ST Bus) वाहकाने धावत्या बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत चांगलाच धुमाकूळ घातला. नशेमध्ये टूल्ल झालेल्या या वाहकाच्या कृत्याला बसमध्ये बसलेले प्रवासी देखील चांगलेच वैतागले. अक्षय बट्टे असे या असं या वाहकाचं नाव आहे. बट्टे याने इतकी दारू ढोसली होती की, त्याने प्रवाशाकडून अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट (Bus Ticket) फाडले. त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये लोळला. (Rajur Amravati Bus Drunken Carrier)

Yavatmal Rajura Bus
गर्भलिंगनिदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश; डॉक्टर फरार

राजूर-अमरावती (Rajur-Amravati) प्रवासादरम्यान धावत्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ स्थानकातून सुटलेली बस राजूरवरून अमरावतीच्या दिशेने येत होती. या बसमधील वाहक अक्षय बट्टे हा मद्यधुंद अवस्थेत टूल्ल होता. बट्टने इतकी दारू ढोसली होती की, त्याला कशाचेही भान नव्हते. धावत्या बसमध्ये तो अक्षरश: इकडे तिकडे लोळत होता. इतकंच नाही तर राजुरा येथून या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना देखील त्याच्या या कृत्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी निघालेल्या एका प्रवाशाला त्याने चक्क 800 रुपयांचे तिकीट दिले. अखेरीस या वाहकाच्या कृत्याला वैतागून बस चालकाने बस थेट यवतमाळच्या अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणली. दरम्यान, धावत्या बसमध्ये वाहकानेच धुमाकूळ घातल्याची माहिती मिळताच यवतमाळ वाहतूक नियंत्रकांनी अक्षय बट्टे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. दिवाळीपासून सुरू झालेला हा संप तब्बल चार महिने चालला होता. या संपामुळे प्रवाशी चांगलेच हैरान झाले होते. दरम्यान, न्यायालयीन लढाईनंतर २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा, असे आदेश राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यामुळे आता एसटी सेवा पूर्वपदावर येत आहे. अशातच या मद्यपी वाहकाने बसमध्येच धुमाकूळ घातल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.