धक्कादायक! चिखलाच्या रस्त्यानं घेतला ८ वर्षीय मुलाचा जीव

ही घटना जुने लखमापूर ते लखमापूर रस्त्यावर घडली.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - चिखलाच्या रस्त्यानं एका 8 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात घडली आहे. पोटात दुखत असल्यानं उपचारासाठी वडील मोटार सायकलवरून दवाखान्यात नेत असताना मोटार सायकल रस्त्यामध्ये झालेल्या चिखलात फसली आणि दवाखान्यात जाण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा बाबुलाल परदेशी असे मृत मुलाचे नाव आहे.

हे देखील पाहा -

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर(Gangapur) तालुक्यातील जुने लखमापूर येथील आठ वर्षीय कृष्णाच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या. या दरम्यान त्याला उलटीही झाली. त्यामुळे वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी गंगापूर येथील रुग्णालयात मोटार सायकलने जात असताना त्यांची मोटार सायकल चिखलात फसली. ती बाहेर काढण्यात त्यांचा बराच वेळ गेला. त्यावेळी दुसरे वाहनही येत नव्हते. त्यामुळे कृष्णाला वेळेवर उपचार मिळाले नाही अन् रस्त्यातच त्याने जीव सोडला.

Aurangabad News
CM एकनाथ शिंदेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले...

ही घटना जुने लखमापूर ते लखमापूर रस्त्यावर घडली. गोदाकाठी असलेल्या पुनर्वसित गावांना शासनाने अद्यापही पाहिजे त्या सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे आजही या गावांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली दिसून येते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळेच मुलाचा बळी गेला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. जायकवाडी धरणामुळे लखमापूर गाव पुनर्वसित झालेले आहे. पुनर्वसित गावांना लागणाऱ्या भौतिक सुविधाही शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत. जवळपास ६३ गावांना साधे रस्तेही नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com