व्यापाऱ्यांचे हातात बोर्ड घेऊन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

सांगली जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट बनत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे हजार ते बाराशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आणखी कडक निर्बध लावण्यात येणार असल्याने व्यापारी वर्गाने मात्र याला विरोध करत आज सोशल डिस्टन्स पाळत हातात बोर्ड घेऊन अनोखे आंदोलन केले..
व्यापाऱ्यांचे हातात बोर्ड घेऊन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन
व्यापाऱ्यांचे हातात बोर्ड घेऊन प्रशासनाच्या विरोधात आंदोलनविजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट Hot Spot बनत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे हजार ते बाराशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आणखी कडक निर्बध लावण्यात येणार असल्याने व्यापारी वर्गाने मात्र याला विरोध करत आज सोशल डिस्टन्स पाळत हातात बोर्ड घेऊन अनोखे आंदोलन केले. An agitation against the administration by holding boards in the hands of traders

कोरोनाच्या Corona काळात व्यापार पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. मात्र जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी वाळवा आणि कडेगाव तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आहेत. या दोन तालुक्याचा फटका सांगली आणि इतर तालुक्याला द्यायचे काम सुरू केले आहे. सरसकट निर्बध लावले जात आहेत. त्यामुळे त्याचा फटका सामान्य व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

व्यापाऱ्यांचे हातात बोर्ड घेऊन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन
...म्हणून या गावांतील शेतकरी 'ही' पिके पंधरा वर्षांपासून घेत नाहीत !

लाईट बिल, कर आणि अनुदान देण्यात यावेत अश्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मालक, कामगार तसेच फळ भाजी विक्रेते, हात गाडीवाले यांचे विविध मागण्यांच हातात फलक घेऊन आप आपल्या दुकानाच्या दारात उभा राहून हे आंदोलन करण्यात आले..

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com