Nanded : सासरच्या जाचाला कंटाळून आठ महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या

Nanded Crime News : पती अविनाश, दीर आणि सासू यांनी मोबाईलचं दुकान टाकण्यासाठी माहेरकडून पैसे आणण्यासाठी तिचा छळ करत होते.
An eight-month-pregnant woman commits suicide after being harassed by her in-law's house in nanded
An eight-month-pregnant woman commits suicide after being harassed by her in-law's house in nandedसंतोष जोशी

नांदेड: नांदेडमध्ये आठ महिन्यांच्या गर्भवती (Pregnant Woman) महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुखेड शहरातील विठ्ठलनगर मधील ही घटना आहे. गितांजली ताटे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. २०२० मध्ये मुदखेडच्या मेंढला येथील गितांजलीचं लग्न मुखेडच्या अविनाश ताटे याच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातचं गितांजलीचा पती अविनाश, दीर आणि सासू यांनी मोबाईलचं दुकान टाकण्यासाठी माहेरकडून पैसे आणण्यासाठी तिचा छळ करत होते. (An eight-month-pregnant woman commits suicide after being harassed by her in-law's house in nanded)

हे देखील पाहा -

An eight-month-pregnant woman commits suicide after being harassed by her in-law's house in nanded
संतापजनक! किरकोळ वादातून महिलेला मारहाण करत लघवी पाजण्याचा प्रयत्न

या सासरच्या जाचाला कंटाळून गितांजलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गितांजलीला शिकून नोकरी करायची होती. तिने आठ दिवसांपुर्वीच बी.ए. द्वितीय वर्षात प्रवेशही घेतला होता. मात्र, तिचे हे स्वप्न अर्धवटच राहीले. दरम्यान गितांजलीच्या आत्महत्या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीसह तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com