
- सागर निकवाडे
Nandurbar News : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील 200 अंगणवाड्या इमारती विना आहेत. बहुतांश अंगणवाडी या झोपडीत भरविल्या जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने या गाेष्टीकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. (Maharashtra News)
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यू चे प्रमाण अधिक असल्याने ते रोखण्यासाठी महिला बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना आणि मातांना विविध सुविधा पुरविल्या जात असतात. मात्र धडगाव तालुक्यात 200 अंगणवाडींना इमारती नसल्याने झोपडीत त्या भरत आहे तर दुसरीकडे गरोदर माता आणि बालकांच्या वजन करण्यासाठी काटाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्यातील सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण धडगाव आणि अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये आहे. कुपोषण आणि माता मृत्यू सोबत दोन हात करण्यासाठी राज्याचा महिला बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडीच्या साह्याने बालकांना विविध पोषण आहार आणि गर्भवती मातांना ही पोषण हार दिला जातो.
त्याचप्रमाणे या मातांचे आरोग्य तपासणी अंगणवाडीत होत असते मात्र अनेक आंगणवाडी गर्भवती मातांच्या वजन करण्यासाठी काटे नाहीत तर एकट्या खुंटामुडी प्रकल्पात 69 अंगणवाडी केंद्रांना इमारती नसल्याने ते अंगणवाडी सेविकेच्या घरात किंवा एखाद्या झोपडीत भरत आहेत.
तर धडगाव तालुक्यातील जवळपास 200 अंगणवाडींना इमारती नसल्याचे चित्र आहे एकीकडे सरकार अंगणवाडी डिजिटल विविध योजनांचा भार अंगणवाड्यांवर देत असली तरी अंगणवाड्यांना इमारती कधी उपलब्ध करून देईल असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.
कोट्यावधी रुपयांचा योजना राबवणाऱ्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने बालकांच्या सुदृढ पोषणासाठी पैसे खर्च केले जातात मात्र अद्यावत अशा इमारती उभ्या केल्या जात नसल्याचं वास्तव असल्याने महिला बालकल्याण विभागाची गत आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खातं अशीच परिस्थिती झाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.