Anganwadi workers Strike : कोरोना काळात दिवस-रात्र कष्ट घेतले, त्याचं फळ काय मिळालं? अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढविण्यावरून राज्य सरकारचा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
anganwadi sevika morcha in sangli
anganwadi sevika morcha in sanglisaam tv

निवृत्ती बाबर

anganwadi workers strike : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढविण्यावरून राज्य सरकारचा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य शासनाने साडे पाच वर्षांपूर्वी मानधन वाढवलं. तर केंद्र सरकारने मानधन वाढवून साडेचार वर्षांचा काळ लोटला आहे. त्याचबरोबर कोरोना हटवण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले. पण त्याचे फळ काय मिळाले? असा सवाल करत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

anganwadi sevika morcha in sangli
उत्तर प्रदेशात महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार...; जितेंद्र आव्हाडांची CM योगी आदित्यनाथ यांच्यावर आगपाखड

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाचा दिला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने निवेदनात म्हटले आहे की,' महागाई दुप्पटीने वाढली पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांच्या (Anganwadi) भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील गायब केल्या. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने जुना मोबाईल भंगारात जायच्या लायकीचा होऊनही, आपण वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलन करूनही नवीन मोबाईल दिलेला नाही'.

'इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर ॲप आपल्यावर लादला. आपल्या खाजगी मोबाईलवरून, जमत नसेल तर इतरांना वेठीला धरून तो भरायला भाग पाडले, उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ केला, धमक्या दिल्या, असेही निवेदनात म्हटले आहे.

'मग दिले तरी काय? तर आश्वासने, आश्वासने आणि फक्त आश्वासनेच! तारीखेवर तारीख, आणि फक्त तारीखच! आता कडेलोट झाला आहे. आपली सहनशक्ती संपली आहे. आपण आता रणशिंग फुंकले आहे. अटीतटीची लढाई लढायला आता आपण सज्ज व्हायचे आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

anganwadi sevika morcha in sangli
Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींकडून संत तुकाराम महाराजांचा अपमान, सोशल मीडियावर संतापाची लाट

'२० फेब्रुवारी २०२३ पासून आपण बेमुदत संपावर (Strike) जाणार आहोत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद. पोषण ट्रॅकर तर भरणारच नाही, पण अहवाल आणि माहिती पण देणार नाही. आता घरात बसून रहायचे नाही, रस्त्यावर उतरून लढायचे, हा आपला निर्धार आहे, असा निश्चय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com