घ्या तुमचे मोबाईल परत, अंगणवाडीसेविकांनी उचलले पाऊल

मोबाईल वापसी आंदोलन
मोबाईल वापसी आंदोलन

गोंदिया ः आता अंगणवाडी सेविका नॉट रिचेबल आहेत. गोंदिया जिल्हाच्या अतिदुर्गम देवरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आज एकात्मिक बाल विकास कार्यालयामार्फत देण्यात आलेला मोबाईल परत करीत आंदोलन केले. त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेधही नोंदवला.

एकात्मिक बाल विकास विभागामार्फत अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांची तसेच विद्यार्थ्यांची योग्य माहिती शासनाला पुरविण्यात यावी यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईलमध्ये चालणारे सॉफ्टवेयर हा इंग्रजी भाषेत असल्याने बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ते भरणेदेखील जमत नाही.Anganwadis return mobile phones to government

मोबाईल वापसी आंदोलन
आता जपून पावलं टाकायची : नारायण राणे

मोबाईलची रॅमदेखील कमी असल्याने हा मोबाईल व्यवस्थित चालत नाही. माहिती भरायला अडचण होत असल्याने तसेच उशिरा माहिती अंगणवाडी सेविका देत असल्याने अंगणवाडी सेविकांचे पगारदेखील कापले जातात.Anganwadis return mobile phones to government

आधीच अल्प पगारात काम करीत परवडत नसल्याने शासनाने हे मराठी किंवा हिंदी भाषेचं चालणारे सॉफ्टवेअर टाकून तसेच रॅम वाढवून नवीन मोबाईल द्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी करीत त्यांच्याजवळ असलेले जुने मोबाईल आज एकात्मिक बालविकास कार्यलयाला परत करीत हे आंदोलन केले. यामुळे या आंदोलनानंतर आता अंगणवाडी सेविका नॉटरिचेबल राहणार आहे.

वनिता डोये व सरिता राहिले या अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाविषयी माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com